जाणून घ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस आणि पेशंट्सबद्दल महत्वाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-कालपर्यंत जिल्ह्यात ४८९ व्यक्तींची तापासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४१९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ४२९ व्यकींना होम क्वारंटाइन करण्यात आले असून, दक्षतेचा उपाय म्हणून १६६ व्यक्तींना निगराणीत ठेवले आहे.

शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेले ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून, जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १७ आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या विदेशींच्या कारणामुळे वाढली आहे. गुरुवारी एकाच दिवसात नऊ रुग्ण सापडले.

दरम्यान जिल्ह्यात आढळलेला पहिला बाधीत रुग्ण अंतीम अहवालानंतर दुसऱ्या कोरोना रुग्णाचा चौदा दिवसांनंतरचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज पुन्हा त्याचा स्त्राव घेऊन नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. 

सर्व कोरोनाबाधित रुग्ण परदेशातून आलेले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाच आतापर्यंत कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आज सकाळी नऊ जणांचे रिपोर्ट आले आहेत.

ते सर्व निगेटीव्ह आहेत. त्यामुळे थोडेसे दिलासादायक वातावरण आहे. परदेशी व्यक्तींमुळे जामखेड तालुक्यातील चार जणांना, संगमनेरमधील तीन व मुकुंदनगरमधील दोन जणांना बाधा झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment