आतापर्यंत कोरोनाने जगभरात घेतले इतके बळी वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ‘कोरोना’ व्हायरस (कोविड-१९) या प्राणघातक विषाणूने आतापर्यंत जगभरातील ५५ हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला असून, साडेदहा लाखांहून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे.

जगातील अध्र्याहून अधिक देशांत ‘लॉकडाऊन’सदृश स्थिती आहे. तद्नंतरही कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन, फ्रान्स आदी देशांतील स्थिती बिकट झाली आहे.

अमेरिकेत मागील २४ तासांत ११०० हून अधिक जणांचा बळी गेल्याने स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. या जागतिक महामारीमुळे वैश्विक अर्थव्यवस्थाही पार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा शुक्रवारी १० लाख ५० हजारांवर पोहोचला. यातील जवळपास २ लाख २० हजार लोक या आजारातून सावरले असून, ५५,३०० हून अधिक जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

एकट्या अमेरिकेत मागील २४ तासांत ११०० हून अधिक बळी गेलेत. अमेरिकेतील सुमारे ६०९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, तब्बल २,४५,३८० जणांना त्याची लागण झाली आहे. येथील ५,४२१ जणांची प्रकृती अद्याप गंभीर असल्यामुळे बळींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment