कोरोना विषाणूला रोखण्यासाठी घरगुती मास्क वापरण्याचे आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  देशात वेगाने प्रसार होत असलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी लोकांना घरगुती मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. खासकरून घराबाहेर पडताना मास्कचा वापर करण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.

घरगुती मास्कच्या वापरामुळे मोठ्या पातळीवर लोकांचा बचाव होईल. अनेक देशांकडून घरगुती मास्कला प्राधान्य दिले जात आहे. सामान्य नागरिकांसाठी हे मास्क फायदेशीर आहेत, असे सरकारने म्हटले आहे.

कोरोनाविरोधातील लढ्यात प्रामुख्याने उतरलेल्या आरोग्य कर्मचारी व इतरांनी विशेष संरक्षण मास्क वापरावेत. परंतु ज्यांना कुठल्याही प्रकाराचा त्रास नाही अशा सामान्य लोकांनी घरगुती मास्कचा वापर करावा.

विशेषकरून घनदाट लोकवस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांनी चेहऱ्यासाठी मास्कचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकाराचे मास्क दररोज गरम पाण्यातून धुवून घेतले पाहिजे. स्वत:च्या मास्कची इतरांसोबत देवाण-घेवाण करू नका.असे सांगण्यात आले आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment