स्वयंशिस्त पाळा, मी घरात थांबणार, मी कोरोनाला हरवणार’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ‘स्वयंशिस्त पाळा, मी घरात थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ मुंबई : प्रत्येकाने स्वयंशिस्त राखली तर कदाचित १४ एप्रिलनंतर काही भागांमध्ये लॉकडाऊन शिथिल होऊ शकेल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘स्वयंशिस्त पाळा, मी घरात थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ हा मंत्र दिला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सुमारे सव्वालाख आयुष डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून, सुमारे दीड हजार व्हेंटिलेटर, अडीच लाख एन ९५ मास्क उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंर्त्यांनी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत सोशल डिस्टंसिंग राखावे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, असे आवाहनही आरोग्यमंर्त्यांनी यावेळी केले.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment