हे तर आमदार बबनराव पाचपुते यांचे अपयश !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीगोंदे कुकडीचे आवर्तन १३ मार्चला सुरू झाले. त्यानंतर आठ दिवसांनी १३२ चे आवर्तन सुरू होणे गरजेचे असताना ते सुरू झालेले नाही. त्यामुळे १३२ खालील शेतकरी भरडला जात आहे, अशी टीका माजी आमदार राहुल जगताप यांनी रविवारी केली.

ते म्हणाले, ५ वर्षांच्या कार्यकाळात पाण्याचे योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न मी केला, पण बबनराव पाचपुते यांनी कायम खोडा घातला. आज ते आमदार असताना घरी बसून पाण्याचे नियोजन करता येत नसेल, तर हे त्यांचे अपयश आहे.

सध्या शेतीची कामे चालू असताना कुकडीचे आवर्तन डोळ्यादेखत खाली जात आहे. पाणी मिळत नसल्याने झालेल्या नुकसानीची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी.

कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तीन दिवसांत तालुक्यातील सर्व वितरिकेचे आवर्तन चालू होईल, असे जगताप यांनी सांगितले.

Leave a Comment