विलगीकरण कक्षासाठी मदरसाने इमारत दिल्याने ग्रामस्थांनी मदरसेच्या मौलानांना जीवनावश्यक वस्तू देणे केले बंद !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर  ;- कोरोनाच्या लढ्यात आपले योगदान देत नगर-पाथर्डी रोड येथील जामिया इस्लामिया इशातुलउलूम अक्कलकुवा संचलित जामिया मोहम्मदिया मदरसा बाराबाबळी (ता. नगर) ने मदरसेने देऊ केलेली इमारत विलगीकरण कक्षासाठी (आयसोलेशन) कार्यान्वीत झाली आहे. मात्र मनपाचे आरोग्य प्रशासन व बाराबाबळीचे ग्रामस्थ सहकार्य करीत नसून, बेजबाबदारपणाचे वर्तन केले जात असल्याचा आरोप मदरसाच्या विश्‍वस्तांनी केला आहे.

मनपा प्रशासनाने मंगळवार दि.7 एप्रिल रोजी संध्याकाळी मदरसाची इमारत ताब्यात घेतली. बुधवारी दि.8 एप्रिल रोजी सकाळी येथे कोरंनटाईन केलेले 77 नागरिक निगराणी खाली आनण्यात आले. मदरसा प्रशासनाने या नागरिकांच्या जेवणाची जबाबदारी उचळली असून, मदरसच्या स्वयंसेवकांना कोणत्याही प्रकारचे पास देण्यास आले नसल्याने त्यांना भाजीपाला, अन्नधान्य आदि जीवनावश्यक वस्तू आनण्यास पहिल्याच दिवशी मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले.

मनपा प्रशासनाकडून संध्याकाळ पर्यंत स्वयंसेवकांना पास मिळाले नाही. तर दुसरीकडे मदरसाच्या पलीकडील इमारतीमध्ये राहत असलेल्या मौलाना, शिक्षकांच्या कुटुंबीयांना बाराबाबळीच्या ग्रामस्थांनी दुध, किराणा व दळणाची (गिरणी) सेवा बंद केल्याने त्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी मदरसेचे व्यवस्थापक सय्यद सादिक गफ्फार, विश्‍वस्त मतीन सय्यद, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, आसिर पठाण यांनी परिस्थितीची पहाणी करुन सदर बाब जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले.

बाराबाबळीचे सरपंच माणिकराव वागस्कर यांच्या निदर्शनास सदर बाब लक्षात आणून दिली असता त्यांनी देखील मदरसामध्ये कोरंनटाईन केलेले नागरिक आनल्याने गावात भितीचे वातारवरण असल्याने ग्रामस्थ असहकार्य करीत असल्याचे स्पष्ट केले. तर ग्रामस्थांची समजुत काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी शेवट पर्यंत संपर्क साधला गेला नाही.

सदर कोरंनटाईन केलेले नागरिकांच्या राहण्याची व जेवणाची जबाबदारी मदरसाने स्विकारली होती. मात्र प्रशासन व गावातील ग्रामस्थ सहकार्य करीत नसल्याने हे कोरंनटाईन केलेले नागरिक कोणाच्या जिवावर सांभाळायचे? असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

मदरसामध्ये कोरंनटाईन केलेल्यांसाठी पाणी, जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्वयंसेवकांना भिंगारसह शहरात भाजीपाला, अन्नधान्य आनण्यासाठी जावे लागत आहे. मात्र पास नसल्याने पोलीस प्रशासन त्यांना ठिकठिकाणी अडवत आहे. या केंद्रावर एका जबाबदार कर्मचार्‍याची नेमणुक करावी, पोलीस बंदोबस्त द्यावा, सेवा देणार्‍या मदरसाच्या स्वयंसेवकांना पास देण्याची मागणी मदरसाच्या विश्‍वस्तांनी केली आहे.

Leave a Comment