विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव : संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरणाऱ्या पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केला असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,शहरात विनाकारण रस्त्याच्या मध्ये उभी राहून तोंडास मास्क न बांधता फिरताना पाच जण मिळून आले. त्याचे अशा कृ तीमुळे कोणलाही संसर्ग जन्य आजार पसरण्याचा संभव आहे.

ते त्यांना माहीत असूनही अशा प्रकारची हयगईचे वर्तन करताना सचिन रतन धनाईत,रा.उत्तमनगर सिडको,नाशिक,प्रतिक कैलास मोरे,वैशाली कैलास मोरे, रा. आंबेडकरनगर,मळेगाव थडी,ता.कोपरगाव,

शानुल लक्ष्मण पवार,रा.बालाजी अंगण सोसायटी,कोपरगाव,विशाल रतन मोरे रा.वेळापूर ता. कोपरगाव हे मिळून आल्याने या पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment