यमराज म्हणतोय नियम पाळा; अन्यथा मी घेऊन जाईन…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर / कर्जत :- लॉकडाऊन काळात कोणीही घराबाहेर पडू नका, संचारबंदीचे नियम पाळा; अन्यथा मी घेऊन जाईन. त्यामुळेच घरात रहा आणि सुरक्षित रहा, असे आवाहन स्वतः यमराज कर्जत शहरात करताना दिसत आहे.

कर्जत नगर पंचायतीच्या वतीने कोरोनाच्या जनजागृतीसाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. कर्जत शहर आणि तालुक्यात आजतागायत कोरोनाच्या लढाईत स्थानिक प्रशासनाने चांगले यश मिळवले.

सर्वच शासकीय विभागाने आपली जबाबदारी योग्य पार पाडले आहे. यामध्ये कर्जत शहरात नगर पंचायत कोरोनाशी लढताना विविध उपक्रम आणि उपाययोजना करत जनजागृतीद्वारे प्रबोधन करत आहे.

शुक्रवारी सकाळी अचानक कर्जत शहराच्या रस्त्यावर थेट यमराजच फिरताना दिसत असून रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना चक्क स्वतः यमराज घरात राहण्याचा सल्ला देत होते. अन्यथा आपणास नाईलाजास्तव बरोबर न्यावे लागेल, असा इशारा देत होते.

तत्पूर्वी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी यमराजाला आमच्या कर्जत शहरातील कोणाला ही नेऊ नका, अशी विनंती केली.

त्यास स्वतः यमराज यांनी तथास्तु म्हटले. मात्र, नियम न पाळणाऱ्या कोणालाही आपण सोडणार नाही, असे म्हणत कोरोनाच्या या दुष्टचक्रात प्रत्येकाने घरीच राहावे, असे आवाहन केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment