Live Updates : लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम – उद्धव ठाकरे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केले असून यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे, राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम राखण्यात येणार आहे. 

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1248936347508719617

Live Updates – 

  • महाराष्ट्र राज्यात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन डाऊन कायम राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत घोषणा
  • मला राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा शून्यावर आणायचाय – उद्धव ठाकरे
  • लॉकडाऊन किती वेळ चालणार हे आपल्या हातात आहे. आपण नियम पाळले व ही साखळी तोडली तर हा लॉकडाऊन लवकर संपेल
  • जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच रहाणार – उद्धव ठाकरे
  • वर्क फ्रॉम होम चालू करा
  • किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन सुरु ठेवावा लागणार
  • १४ तारखेनंतर काही ठिकाणी बंधने शिथील होतील, ज्या ठिकाणी अधिक रुग्ण आहेत त्या ठिकाणी अधिक कडक बंधने होतील
  • ही जी एकजूट मी पाहतोय ती कायम राहिली तर लवकरच आपण या संकटावर मात करू
  • राजकारण पाचवीला पुजलेय पण आता यात मला राजकारण नकोय. पक्षीय राजकारण थांबली पाहिजे.
  • सगळी राज्य सरकार केंद्र सरकार सोबत आहोत

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment