महात्मा जोतिबा फुलेंचे चरित्र ‘वर्क फ्रॉम होम’ अभ्यासणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉक डाउन असल्याने शाळा- महाविद्यालये बंदच आहेत. परंतु महात्मा जोतिबा फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान आभाळाएवढे असून त्यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक विद्यार्थीनींने त्यांच्या चरित्राचा अल्पसा का होईना अभ्यास घरीच करून ‘वर्क फ्रॉम होम’ या अनोख्या पद्धतीने येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी महात्मा फुलेंना अभिवादन केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. भाऊसाहेब औटी यांनी दिली.

यत शिक्षण संस्था शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा यशस्वीपणे सांभाळत असून लॉकडाउनच्या काळात येणाऱ्या थोरामोठ्यांच्या जयंत्या -पुण्यतिथी त्यांचे चरित्र अभ्यासून साजरी करण्याची संकल्पना महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी मांडली होती अशी माहिती प्रा.सतीश शिर्के यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदिनी सुद्धा असेच अभिवादन केले जाणार आहे.सध्या महाविद्यालयाचे कामकाज बंद असून सोशल मीडियाचा आधार घेऊन मुलींना महात्मा फुले यांचे चरित्र थोडक्यात उपलब्ध करून दिले असून त्याचा अभ्यास करण्याबाबत संदेश दिला असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ मनोहर करांडे यांनी दिली.

या कामी संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. योगिता रांधवणे, प्रा. बबनराव कातोरे, डॉ. संतोष गायकवाड, डॉ. हेमंत अकोलकर, प्रा. अनिल कापरे, प्रा. संभाजी कातोरे, प्रा. अनुप शिंदे यांचे सहकार्य लाभत आहे. या अनोख्या पद्धतीच्या अभिवादन पद्धतीचे स्वागत रयतचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, महाविद्यालय विकास समिति सदस्य स्नेहलताई काळे यांनी केले आहे.

Leave a Comment