अहमदनगर ब्रेकिंग : वॉर्डबॉयची नजर चुकवत क्वारंटाइन केलेला अधिकारी पळाला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- कोरोना पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक म्हणून काम करणार्‍या एका अधिकार्‍याला जिल्हा शासकीय रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते.

दुपारी दाखल केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.14 दिवस त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवले जाणार होते. मात्र सायंकाळी तो गायब झाला. या घटनेची माहिती प्रशासनाने पोलिसांना दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एक अधिकारी सिव्हिल हास्पिटलमून पळून गेला आहे. या अधिकाऱ्याचा आता पोलीस शोध घेत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगरमधील कार्यालयात दुय्यम निरिक्षक असलेला हा अधिकारी पुण्याला गेला होता.

नगरला आल्यानंतर तो आजारी पडला. सर्दी, खोकला असल्यामुळे एका खासगी डाक्टरकडे गेला होता. परंतु करोनाची लक्षणं दिसू लागल्याने हा अधिकारी नंतर सिव्हिल हास्पिटलमध्ये गेला.

रविवारी दुपारी त्याचा तपासणीसाठी स्त्राव घेण्यात आला. त्यानंतर त्याला डाक्टरांनी हास्पिटलमध्ये क्वारंटाइन राहण्यास सांगितलं.यानंतर वॉर्डबॉय हा अधिकाऱ्याला बेडकडे घेऊन जात होता. त्याचवेळी वॉर्डबॉयची नजर चुकवून हा अधिकारी निघून गेला.

हॉस्पिटलच्या आवारात कुठे तरी हा अधिकारि गेला असावा असे वॉर्डबॉयला वाटले. त्याने शोधून ही अधिकारी सापडला नाही. शेवटी रात्री सिव्हिल प्रशासनाने तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या अधिकाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment