आता ‘या’ शहरात पोहोचला कोरोना ..पुढचे सात दिवस रहाणार 100 टक्के लॉक डाऊन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :-  जिल्हा रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी एका व्यक्तीचा स्त्राव चाचणी अहवाल आज प्राप्त झाला असून तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर ५० वर्षीय व्यक्ती नेवासे शहरातील असून त्याला सर्दी, दम लागणे आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.

दिनांक ११ एप्रिल रोजी या व्यक्तीच्या घशातील स्त्राव नमुना चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते, तो अहवाल आज प्राप्त झाला. त्यात ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दि.19 एप्रिल पर्यंत 100 टक्के लॉक डाऊन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली. 

नेवासा शहरातील माळीवस्ती, नेवासा खुर्द या भागामध्ये दि.13 एप्रिल रोजी एक रुग्ण कोरोना बाधित असल्याचे झालेल्या तपासणीत संक्रमित आढळुन आलेला आहे.

सदरचा रुग्ण हा नेवासा नगर पंचायत हददीतील रहीवाशी असुन त्याच्यापासुन सदर आजाराचा इतर व्यक्तींना प्रादुर्भाव /प्रसार होऊ नये यासाठी नेवासा नगर पंचायत हद्दीमधील नविन कोर्ट परिसरापासुन नेवासा शहर परिसर

व आजुबाजुच्या वस्त्यामधील सर्व अत्यावश्यक सेवा (किराणा दुकान, दुध, भाजीपाला, औषधाचे दुकाने, दवाखाने व नागरी तथा सहकारी बॅका ) यासह इतर सर्व अस्थापना दि.13 रोजी दु. 12.00 वाजेपासुन दि.19 एप्रिल सकाळी 06.00 वाजेपर्यंत बंद करण्यात येत आहेत.

स्वच्छता सेवा, पाणी पुरवठा सेवा, आग्निशमन सेवा, विदयुत वितरण सेवा, सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापना यांना या आदेशातुन वगळण्यात येत आहे.

कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता  1860 मधील कलम 188 व साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 नुसार कारवाईस पात्र राहील.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment