लाखो बेरोजगार, लहान व्यावसायिक उद्ध्वस्त, कोरोना व्हायरसमुळे आले हे संकट …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- भारतासह इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये ४० वर्षांतील सर्वात कमी आर्थिक विकास दर नाेंदवला जाऊ शकतो. हा दर २.८ टक्क्यांच्या खाली राहू शकतो.

कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान जागतिक बँकेने रविवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात हे मूल्यांकन करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांमुळे पूर्ण आशियात पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. एकट्या भारतात लॉकडाऊनमुळे १.३ अब्ज लोक घरात बंद आहेत,

देशभरात लाखो तरुण बेरोजगार आहेत. लॉकडाऊनमुळे मोठे आणि लहान व्यवसाय प्रभावित झाले आहेत. लाखो स्थलांतरित मजूर शहरांमधून आपल्या गावी परतले आहेत.

जागतिक बँकेने ७ एप्रिलपर्यंतच्या सर्व देशांच्या माहितीवरून हा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार भारताशिवाय श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि बांगलादेशाच्या आर्थिक विकासात जलद घसरण दिसून येईल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

Leave a Comment