अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू …जिल्ह्याची चिंता वाढली !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम :-  कोपरगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांची संख्या दोन झाली आहे.

मागील आठवड्यात श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील एका तरूणाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आता या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 28 जणांना लागण झाली आहे. गेल्या शुक्रवारी कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील या 60 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले होते.

त्या आधीच तिला ग्रामीण रुग्णालयात न्यूमोनियाची उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर या महिलेस नगर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दोन दिवसांपूर्वी तिला जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी महिलेचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment