आज बिग बॉस 17 मध्ये 17 स्पर्धकांची एंट्री होणार ! प्रीमियरपूर्वीच स्पर्धकांची नावे समोर, पहा लिस्ट..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bigg Boss 17 : सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय शो बिग बॉसचा नवा सीझन आजपासून सुरू होत आहे. होय हे खरे आहे. सलमान खान रात्री 9 वाजता बिग बॉस 17 च्या सर्व स्पर्धकांची अधिकृत ओळख करून देईल.

पण प्रीमिअरच्या काही तास आधीच बिग बॉस 17 च्या 17 स्पर्धकांची नावे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत. चला तर मग जाणून घेऊया बिग बॉसच्या घरात कोणते सिलेब्रेटी मनोरंजनाची भर घालणार आहेत.

* 17 स्पर्धक बिग बॉसच्या घरात होणार दाखल

बिग बॉस शोशी संबंधित बातम्या किंवा सोशल मीडिया पेज द खबरी यांनी दिलेल्या माहिति नुसार स्पर्धक उघड केले आहेत. बातमीनुसार, बिग बॉस 17 मध्ये 17 स्पर्धक प्रवेश करणार आहेत. ज्यामध्ये मुनावर फारुकी, अनुराग डोवाल, अंकिता लोखंडे, विकी जैन,

ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, जिग्ना वोरा, फिरोजा खान, रिंकू धवन, अरुण श्रीकांत मशेट्टी, नेविड सोल, सना रईस खान, सोनिया बन्सल आणि सनी आर्याच्या नावाचा समावेश आहे. अनेक सेलिब्रिटी चेहरे आणि काही सामान्य लोक बिग बॉस 17 मध्ये प्रवेश करणार आहेत.

* फर्स्ट डे फर्स्ट शो होणार धमाकेदार

बिग बॉस 17 ची धमाकेदार सुरुवात होणार आहे. सलमान खान स्पर्धकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करेल आणि त्यानंतर प्रत्येक स्पर्धक घरात प्रवेश करेल. शोच्या पहिल्या दिवसाचा पहिला शो कलर्स चॅनल आणि जिओ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रात्री 9 वाजता प्रसारित केला जाईल.

यावेळी बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना दिल, दिमाग आणि दम या गोष्टींची गरज लागणार आहे. याचे कारण म्हणजे शोच्या निर्मात्यांनी शो मध्ये बरेच बदल केले आहेत, ज्यामध्ये थेरपी रूमपासून आर्काइव्ह रूमपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. काही रिपोर्ट्स अशीही माहिती देतात की, यावेळी काही स्पर्धकांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगीही मिळणार आहे.

* ‘बिग बॉस 17’ कधी आणि कुठे पाहता येणार ?

‘बिग बॉस 17’ आज 15 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजता सुरू होत आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता, तर शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता दाखवला जाईल. तुम्ही हा शो टीव्हीवर पाहू शकता. तसेच तो जिओ सिनेमावरही पाहता येईल. या प्लॅटफॉर्मवर 24 तासांत केव्हाही हा शो पाहता येईल.