मोठी बातमी ; अहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ कारखाने सुरू होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :- सरकारने लॉकडाऊन काळात जे उद्योग सुरू करण्याबाबत सवलत दिली आहे, असे कारखाने चालू करण्यासाठी कोणत्याही लेखी पूर्वपरवानगी आवश्यक नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवारी सांगितले.

त्यामुळे विविध जीवनावश्यक वस्तू व शेतीशी निगडित उत्पादने सुरू होऊ शकतील. अन्न व संबंधित वस्तू, साखर, दुग्धशाळा, पशुखाद्य आणि चारा युनिट,

औषध, लस, सॅनिटायझर्स, साबण आणि डिटर्जंट्स, मास्कचे उत्पादन, जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन व सहायक सेवा आदींचा त्यात समावेश आहे.

शेती उत्पादनांशी संबंधित प्रक्रिया, पॅकेजिंग व वाहतूक, खते, कीटकनाशके व बियाण्याचे उत्पादन व पॅकेजिंग युनिट आदींचाही यात समावेश आहे. खाद्यपदार्थ, गव्हाचे पीठ, कडधान्य आणि खाद्यतेल निर्मितीलाही लेखी परवानगीची गरज असणार नाही.

या उद्योगांनी कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने माल वाहतुकीस परवानगी दिली असल्याने सर्व वस्तूंच्या वाहतुकीस परवानगीची आवश्यकता नाही. वाहनावरील स्वयंघोषणापत्र पुरेसे मानले जाईल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment