अहमदनगर ब्रेकिंग : निधनानंतर चार दिवसांनी ‘त्या’ व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर – निधनानंतर चार दिवसांनी जामखेड तालुक्यातील व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले.हा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यावर घरातील चार व्यक्ती व संबंधित व्यक्तीला तपासणाऱ्या खासगी हाॅस्पिटलच्या डॉक्टरांना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले.

दरम्यान, परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या चारही जणांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना रविवारी दुपारी नगर येथून सोडण्यात आले आहे.

त्यांना आता जामखेड येथील डॉ. आरोळे हाॅस्पिटलमध्ये चौदा दिवस विलिनीकरण कक्षात ठेवले जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. युवराज खराडे यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

कोरोनामुळे जामखेड शहर २३ एप्रिलपर्यंत हाॅटस्पाॅट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील आवश्यक सेवांसह सर्व शहर बंद करण्यात आले.

शहरातून जाणाऱ्या चारही जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरचे कोणीही आत प्रवेश करू शकत नाहीत. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, तेथे आरोग्य खात्याने तातडीने तपासणी मोहीम राबवली.

त्यातच एक व्यक्ती कोरोनाने मरण पावल्याचे स्पष्ट झाले. या व्यक्तीला सुरूवातीला येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु फक्त तपासणी करून सोडून देण्यात आले.

दुसऱ्या दिवशी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅ. खराडे यांनी तपासणी करून पुढील उपचारांसाठी नगरला पाठवले. त्या व्यक्तीचे नगर येथे निधन झाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment