रोहित पवारांचा कर्जत-जामखेडसाठी पुन्हा ‘मदतीचा हात’ ! १५ हजार कुटुंबांसाठी ४ ट्रक कांदा-बटाटे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर – कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालखंडात कर्जत-जामखेडसाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा ‘मदतीचा हात’ पुढे आला आहे.

मतदारसंघातील गोर-गरीब शिधापत्रिका नसणाऱ्या, भूमीहीन, मोलमजुरी करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या, ज्यांना शिधापत्रिका आहेत परंतु त्यांची शासनस्तरावर नोंदणी नसल्याने धान्य मिळत नसलेल्या लोकांना आता एक किलो कांदा व एक किलो बटाटा देण्यात येणार आहे.

ही मदत तालुक्यातील स्थानिक प्रशासनाच्या मदतीने गरजुंना पोहोच करण्यात येणार आहे. हे वाटप करत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळला जावा, गर्दी होऊ नये, कसल्याही प्रकारचा दिखावा होऊ नये म्हणून ही मदत प्रशासनाच्या मदतीने वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या मदतकार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत.

मागील आठवड्यातही आमदार रोहित पवार यांनी आपल्या दात्रुत्वातुन मतदारसंघात सुमारे पाच ट्रक गहू आणि डाळ असे धान्य पोहोच करून गरीब कुटुंबाची काही दिवसांची भुक भागवली आहे.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दि.३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यामुळे गोर-गरीब कुटुंबांना,मोलमजुरांना आ.पवार यांनी मदतीचा हात दिला आहे.

संकटकाळात मतदारसंघातील कुणावरही उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये यासाठी विशेष ‘वॉच’ ठेवणाऱ्या आ.पवारांनी आरोग्याबाबत देखील काळजी घेत मतदारसंघच नव्हे तर संपुर्ण राज्यभर सॅनीटायझरचे वाटप करून त्यांनी सुरू केलेल्या ‘कोरोनाशी लढुना’ या मोहिमेत आपले मोलाचे योगदान देऊन राज्यशासनालाही हातभार लावला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment