‘या’ ठिकाणची कोरोना स्थिती गंभीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24  :- मुंबई आणि पुण्यासह देशातील ११ शहरांमध्ये कोरोनाने रौद्ररूप धारण केले आहे. ही स्थिती गंभीर असून, या राज्यांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे केंद्राच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे या शहरांतील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने सहा आंतरमंत्रालयीन समित्या नेमल्या आहेत. दरम्यान, ५ अधिकाऱ्यांचे केंद्रीय पथक सोमवारी पुण्यात दाखल झाले.

त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

मुंबई, पुणे, इंदूर, जयपूर, कोलकाता, हावडा, मिदनापूर पूर्व, २४ परगना उत्तर, दार्जिलिंग, कलिंपोंग आणि जलपाईगुडी या राज्यांमध्ये कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणावर आपले पाय पसरवीत आहे.

कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून लॉकडाऊन लागू केले आहे. यात सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment