अहमदनगर जिल्ह्यातील हा तालुका झाला ‘कोरोनामुक्त’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- राहात्यात आढळलेल्या रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुका कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

तथापि, लॉकडाऊनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इंडोनेशियातील व्यक्ती कोल्हार, भगवतीपूर, लोणी खुर्द व बुद्रूक, हसनापूर, दाढ बुद्रूक, पाथरे व हनंमतगाव या सात गावांतील पंचवीस व्यक्तींच्या संपर्कात आला होता.

या व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले असता लोणी खुर्दमधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या व्यक्तीवर ४ एप्रिलपासून नगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

चौदा दिवसांनंतर त्याचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या पंचावन्न व्यक्तींनाही शिर्डी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

त्यांच्यात चौदा दिवसांत कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने सर्वांची राहाता ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून घरी सोडण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment