स्वच्छता कर्मचारींच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत व विम्याचे संरक्षण देण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर – कोरोना विरुध्दच्या लढाईत स्वच्छता कर्मचारी एका वॉरियर्स प्रमाणे दररोज लढा देत आहे. या विषाणूच्या महायुध्दात डॉक्टर, पोलीस व प्रशासनाच्या खांद्याला खांदा लाऊन स्वच्छता कर्मचारी महत्त्वाचे योगदान देत असताना

त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत व विम्याचे संरक्षण देण्याची मागणी सुमन इंटरप्राइजेस मॅन पावर संचालक तालेवर गोहेर, अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सनि खरारे, अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतचे महाराष्ट्र महासचिव राहुल लखन यांनी शासनाकडे केली आहे.

कोरोनाच्या लढ्यात डॉक्टर, पोलीस व प्रशासकीय अधिकारी कर्मचार्‍यांसह स्वच्छता कर्मचारी योगदान देत आहे. यामध्ये स्वच्छता कर्मचारीच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. या कोरोना वॉरियर्सचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र स्वच्छता कर्मचारी हा उपेक्षित व दुर्लक्षीत घटक आहे.

हॉस्पिटलपासूनच्या वॉर्ड बॉयपासून तर सर्वसामान्यांच्या दारा पर्यंत येऊन स्वच्छता कर्मचारी आपले कार्य करीत आहे. लॉक डाऊनमध्ये या सेवेमध्ये वाढ करुन स्वच्छता कर्मचारी सर्वांचे आरोग्य जपत आहे.

ग्राऊंड लेवलपर्यंत जाऊन हा कर्मचारी आपली सेवा देत असून, त्याला देखील कुटुंब व परिवार आहे. त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने व बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत व विम्याचे संरक्षण देण्यासाठी

सामाजिक संघटना व शासनाने पुढाकार घ्यावा, ठेकेदार मार्फत स्वच्छतेची सेवा देणार्‍या सफाई कर्मचार्‍यांचे वेतन कपात करु नये व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील काळजी घेण्याची मागणी करणात आली आहे.

Leave a Comment