उपनेते अनिलभैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कौतुकास्पद उपक्रम, 28 दिवसांपासून सातत्याने दररोज 3000 लोकांपर्यंत अन्नवाटप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- देशात सध्या कोरोना विषाणूमुळे दहशत पसरली आहे. त्यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय घेत जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

नगर शहर शिवसेनेच्या वतीने संचारबंदी काळात गोरगरीब आणि गरजू आहेत, विविध ठिकाणी अडकलेले आहेत अशांसाठी अन्नछत्र मोबाईल व्हॅन तर्फे मोफत अन्न पोहोचवण्याचं काम शिवसैनिक करत आहेत.

शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहर शिवसेनेच्या वतीने गेल्या 28 दिवसांपासून सातत्याने दररोज 3000 लोकांपर्यंत शिवसेना हे अन्न गरजू लोकांपर्यंत पोहोचवत आहे. 

ज्यांना कोणी नाही ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अत्यंत गोरगरीब या लोकांना अन्न देण्याचं काम शिवसेनेच्या मार्फत होत आहे.

जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, शहर शहरप्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव , विक्रम राठोड , मेहुल भंडारी , मनीष गुगळे, विशाल वालकर, मनोज चौहान यांचा यात सक्रीय सहभाग आहे.

भारतीय नागरिक व येथील संस्कृती पारंपारीक पद्धतीने चालत आली आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा शिवसेना सर्व प्रथम धावून जाते.

हे अन्नछत्र शहर व उपनगरच्या विविध भागामध्ये जाऊन गरजूंना देण्यात येते. हे अन्नछत्र लॉकडाऊन संपेपर्यंत सुरु राहणार आहे असे माजी आमदार अनिल राठोड यांनी याबाबत बोलताना सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment