धक्कादायक : पारनेर मध्ये खरेदी करणारा निघाला कोरोनाबाधित !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर :- पुण्याहून परभणीकडे जाताना सुप्यात पाण्याची बाटली खरेदी करणारा दुचाकीस्वार कोरानाबाधित असल्याचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्रशासनाने संबंधित किराणा दुकानदारासह त्याचे कुटुंब क्वारंटाइन केले असून दुकानाच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांचाही शोध घेतला जात आहे. परभणी येथील तरूण भोसरी येथे नोकरीस असून १२ एप्रिलला तो दुचाकीने परभणीकडे निघाला.

सुप्यात आल्यानंतर त्याने बाटलीबंद पाणी खरेदी केले. परभणी येथे पोहोचल्यानंतर त्रास होऊ लागल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता २० एप्रिलला तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर परभणीपासून पुण्यापर्यंतची प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. पुण्यात त्याचा कोणाशी संपर्क आला, प्रवासादरम्यान तो कोठे थांबला याचा शोध घेण्याचे काम सुरू झाले.

सुपे येथे महामार्गावर असलेल्या एका दुकानदारासह त्याच्या कुटुंबाला क्वारंटाइन करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

Leave a Comment