प्रवरेतून पाण्याची उधळपट्टी का?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :- प्रवरा नदीचे तब्बल चाळीस दिवस चाललेल व पाच टीएमसीपेक्षा जास्त पाणीवापर झालेले असताना लगेच तिसऱ्या दिवशी आवर्तन कशासाठी व पाण्याची उथळपट्टी का असा सवाल भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री व जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे पाठवलेले निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी धरण लाभक्षेत्रात भरपूर पाऊस झाला असून धरणातील पाणी पातळी चांगली आहे. मात्र पाटबंधारे खाते पाण्याची उधळपट्टी करीत नाही ना अशी शंका येत आहे. भंडारदरा व निळवंडे धरणातून ७ मार्चला उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले.

त्यावेळी त्यावेळी भंडारदरा धरणात १० हजार १७६ दशलक्ष घनफुट, तर निळवंडे धरणात ५ हजार ९१४ दशलक्ष घनफुट पाणीसाठा होता. रब्बीचे पाहिले आवर्तन अतिशय मोठे झाले. तब्बल पाच दलघफु पाणीसाठा खर्ची पडला. आता भंडारदरा धरणांतील पाणीसाठा ६ हजार ५७५ दलघफू व निळवंडे धरणात ४ हजार ३७४ दलघफू आहे.

आता १६ एप्रिलला हे आवर्तन बंद झाले. अन् लगेच २० एप्रिलला परत रब्बीसाठी उन्हाळी आवर्तन २०-२५ दिवसांसाठी १५०० क्यूसेसने पाणी सोडण्यात आले. मागणी नसताना आहे पाणी म्हणून उधळपट्टी करायचे असे पाटबंधारे विभागाचे धोरण चुकीचे आहे त्यामुळे तातडीने बंद करण्यात यावे.

याबाबत भंडारदरा विभागाचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता तीन दिवसांत आवर्तन कसे सुटले असे विचारले असता १५ दिवसांपूर्वीच कालव्याचे पाणी बंद करून केटी वेअरला सोडले होते. त्यामुळे हे आवर्तन सुरू केले आहे असे उत्तर दिले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment