तर रमजान घरच्या घरीच साजरी करण्याचे आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पाथर्डी रोड येथील जामिया इस्लामिया इशातुलउलूम अक्कलकुवा संचलित जामिया मोहम्मदिया मदरसा बाराबाबळी (ता. नगर) येथील विलगीकरण कक्षातून 144 क्वॉरन्टाईन नागरिकांना शुक्रवार दि.24 एप्रिल रोजी सोडण्यात आले.

मदरसाच्या विश्‍वस्त व स्वयंसेवकांनी क्वॉरन्टाईन नागरिकांना मास्कचे वाटप करुन कोरोनाच्या बचावासाठी घरा बाहेर न पडता स्वत:सह कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे व रमजानच्या महिन्यात नमाज, उपवास घरातच करण्याचे आवाहन केले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुकुंदनगर, आलमगीरसह शहरातील इतर भागातील 158 नागरिकांना बाराबाबळी मदरसाच्या विलगीकरण कक्षात 14 दिवसासाठी क्वॉरन्टाईन करण्यात आले होते. यापैकी 14 नागरिकांना दि.18 एप्रिल रोजी सोडण्यात आले. तर उर्वरीत 144 नागरिकांना शुक्रवारी सोडण्यात आले.

या नागरिकांना पुढील 14 दिवसासाठी होम क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे. यावेळी मदरसेचे आसिर पठाण, व्यवस्थापक सय्यद सादिक आत्तार, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, मौलाना कारी अब्दुल कादिर, मौलाना नाजीम, शाहिद पठाण आदिंसह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

मदरसाचे मुख्य मौलाना गुलाम मुस्तफा यांनी कोरोना हे संपुर्ण मानवजातीवर ओढवलेले संकट आहे. या संकटात सर्वांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. या महामारीचा कोणत्याही धर्म, जातशी संबंध नसून, कोणत्याही अफवावर विश्‍वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

तर देशासह जगातून ही महामारी जाण्यासाठी अल्लाह चरणी त्यांनी प्रार्थना केली. रमजान हा पवित्र उपासनेचा महिना असून, या महिन्यात संयमाची शिकवण मिळते. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिक संयमाने लढा देत आहे.

रमजानमध्ये प्रत्येक मुस्लिम समाजबांधव प्रशासनाच्या नियमांचे पाळन करुन ही महामारी हद्दपार करण्यासाठी आपले योगदान देऊन घरातच रमजानची उपासना करणार असल्याचा विश्‍वास मन्सूर शेख यांनी व्यक्त केला. आसिर पठाण यांनी बाराबाबळी मदरसाने माणुसकीच्या नात्याने कोरोनाच्या युध्दात आपले योगदान दिले आहे.

विलगीकरण कक्षात क्वॉरन्टाईन नागरिकांचा नाष्टा, चहा-पाणी व जेवणासह सर्व भौतिक सुविधा कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता संपुर्ण सुविधा पठाण ब्रदर्स व मदरसाच्या विश्‍वस्तांनी दिलेली आहे.

भविष्यात या सेवेच्या नावावर कोणीही बिल अथवा अनुदान लाटू नये याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. क्वॉरन्टाईन असलेल्या नागरिकांनी देखील मदरसाच्या विश्‍वस्तांनी निस्वार्थ भावनेने दिलेल्या उत्तम सेवेचे कौतुक करुन आभार मानले.

Leave a Comment