अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा इन्स्टिट्यूटमध्ये अवघ्या पाच सेकंदात कळणार कोरोना रुग्णाचा रिपोर्ट !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोणी : – कोरोनाचे टेस्टसाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारा मोठा खर्च लक्षात घेऊन केवळ एक्स रे आणि रक्त चाचणीच्या साह्याने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘चे तंत्रज्ञानाचा वापर करुन काही सेकंदात रग्णांची वर्गवारी कोरोनाबाधित, कोरोना संशयीत व इतर हे शोधण्याची ही प्रणाली प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस आणि ग्रेट ब्रिटन स्थित एआय फाॅर वर्ल्ड या संस्थेशी परस्पर सहकार्य करार करुन पुढे आणली आहे.

देशात कोरोना चाचणीसाठी लागणाऱ्या टेस्ट किटची असणारी कमतरता. त्याला लागणारा वेळ , टेस्ट लॅबची क्षमता व कोरोना आणि कोरोना शिवाय इतर आजारातील फरक ओळखण्यासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस काही नविन तंत्रज्ञान वापर करता येईल का यांचा शोध घेत असतांनाच एआय फाॅर वर्ल्ड संस्थेचा कार्यकारी संचालक

व आपल्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले डाॅ वैभव देशपांडे यांच्या बरोबर परस्पर सहकार्य करार करुन देशात प्रथमचं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘ साह्याने प्राथमिक चाचणी करण्याचे तंत्रज्ञान पुढे आणले आहे अशी माहिती प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचे उपकुलपती डाॅ.राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘ चार वापर करुन आरोग्य क्षेत्रात निदानाची नविन शाखा विकसित होत आहे. इतर देशात हे तंत्रज्ञान वापरले जाते पण आता भारतात हे तंत्रज्ञानाचा वापर आम्ही सुरु करीत आहोत. कोरोनाच्या चाचणीत रुग्णांचा एक्स रे आणि रक्त तपासणीच्या रिपोर्ट अपलोड केल्यानंतर फक्त पाच सेकंदात संगणकाच्या साह्याने रुग्ण कोविड बाधीत आहे किंवा नाही यांची शक्यता तपासता येत.

या प्रणालीने ९९.९ टक्के इतके अचुक निदान करणे शक्य आहे. या चाचणीच्या शासकीय मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. देशासाठी या परिस्थितीत हे तंत्रज्ञान मोठी उपलब्धी ठरु शकते अशी माहिती अभिमत विद्यापीठाचे संशोधन विभागाचे प्रमुख डाॅ राहुल कुंकुलोळ यांनी दिली.

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘ वापर करुन भारतात आरोग्य सेवेत हे तंत्रज्ञान ग्रामीण भागात कसे वापरता येईल यासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठा बरोबर अधिक संशोधन करुन कोरोनासह इतर आजारावरील निदान चाचण्या पुढे आणु असे यावेळी एआय फाॅर वर्ल्ड संस्थेचे कार्यकारी संचालक डाॅ वैभव देशपांडे यांनी व्हिडीओ काॅनफरन्सवर बोलतांना सांगीतले.

ही प्रणाली विकसित करण्यासाठी त्यांच्या संघात नेदरलॅडंचे सचिन कुलकर्णी , कॅनडाचे अमित साहु, व युकेचे विधी तज्ञ हिमांशु दासरे यांचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ वाय.एम. जयराज, डाॅ. सुरेश जंगले ,डाॅ. रविंद्र कारले आदी मान्यवर उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment