आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास पाचशे लिटर सॅनीटायझरचे वाटप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशासह महाराष्ट्रात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्याच्या लढ्यात महत्त्वपुर्ण योगदान देणार्‍या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांसाठी आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीच्या वतीने पाचशे लिटर सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.

तेलीखुंट पॉवर हाऊस जवळील जुने सिव्हिल हॉस्पिटल येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सॅनीटायझरचे बॅरल देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, वैभव खेंगट, राहुल बहिरट आदिंसह जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

कोरोनाशी लढा देताना सॅनीटायझर हे जीवनावश्यक वस्तू बनले आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन सेवा देत आहे. कोरोनाच्या संघर्षात कर्तव्य बजावत असताना त्यांना सॅनीटायझरची नितांत आवश्यकता आहे.

या सामाजिक बांधिलकीने आमदार रोहित पवार यांचा चालू असलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

 

Leave a Comment