दहावीचा निकाल ‘इतके’ दिवस लांबणार!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :-  कोरोना विषाणूच्या संकटाने शैक्षणिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, त्यामुळे दहावीचा निकाल यंदा आठवडाभर उशिराने लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे उत्तरपत्रिका तपासणीला काहीसा विलंब झाल्याने दहावी परीक्षेचा निकाल निर्धारित वेळेपेक्षा आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे.

संचारबंदीमुळे उत्तरपत्रिकांच्या संकलनावरदेखील परिणाम झाला असून, आता लॉकडाऊन उठल्यानंतर नियामकांकडून ३ मे पासून उत्तरपत्रिकांचे संकलन केले जाणार आहे.

या संकलनासाठी साधारणत: पाच ते सात दिवसांचा कालावधी लागणार असून, त्यानंतर गुणसंकलन आणि गुणपत्रिका तयार करण्यासाठी महिनाभराचा कालावधी जाणार असल्याने दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलला जाणार आहे.

इतिहास वगळता इतर विषयांच्या पेपर तपासणी वेळेत होत आहे. सध्या पोस्टाचे व इतर ट्रान्सपोर्टचे काम बंद असल्याने इतिहासाचे पेपर तपासणीसाठी शिक्षकांपर्यंत पोहोचलेले नाही.

३ मेपर्यंत लॉकडाऊन संपल्यावर ते पोहोचवण्यात येतील. नेहमीपेक्षा एक आठवडा निकालास त्यामुळे उशीर होऊ शकतो.

बारावी परिक्षेच्या उत्तरपत्रिकांचे संकलन मात्र निर्धारित वेळेत झाल्याने बारावीचा निकाल निर्धारित वेळेतच अर्थात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment