अहमदनगरमध्ये तीन दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. बुधवारी १८ जणांपैकी ११ अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आहेत.

बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात मोठे आहे. आतापर्यंत चोवीस बाधित रुग्णांना १४ दिवसांच्या उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. १४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

सोमवारपासून सलग तीन दिवस जिल्ह्याला दिलासा मिळत अाहे. तीन दिवसांत एकही बाधित आढळून आलेला नाही. जामखेड व संगमनेरमधील रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण जामखेडमध्ये आढळले आहेत. तेथे १७ जणांना बाधा झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाने पुणे येथील प्रयोगशाळेत पाच जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.

त्यापैकी दोघांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. सात जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment