अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ जोडप्यास कोरोनाची लागण, १७ जणांना आरोग्य विभागाने केले होमक्वारंटाईन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अकोले तालुक्यातील माळीझाप येथे राहणाऱ्या व सद्या वास्तव्य नाशिकमध्ये असलेल्या एका  जोडप्यास कोरोना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

सदर कोरोनाबाधित रुग्ण तरुण हा नाशिक ग्रामीण पोलीस दलात भरती असून त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आल्याचे लक्षात आले आहे.

विशेष बाब म्हणजे हा पोलीस कर्मचारी त्यांच्या भाचीच्या संपर्कात आल्याने तिच्या कुटूंबास नगर जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.व घरातील १७ जणांना आरोग्य विभागाने होमक्वारंटाईन केले आहे.अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळीझाप परिसरात एक तरुण गेल्या काही वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहे. त्याची ड्युटी मालेगाव येथे लावण्यात आली होती.

विशेष म्हणजे तो आजारी पडला तरी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. मात्र दि. २२ एप्रिल रोजी त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर २३ एप्रिल रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर सगळी धांदल उडाली. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या पत्नीस तपासले असता त्यांचा देखील रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. हा प्रकार गेला आठवडाभर गुपित राहिला.

मात्र, आज १ मे रोजी त्यांच्या सानिध्यात असलेली त्याची भाची आजारी पडल्याने त्यांनी सावध भुमीका घेत अकोले आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ तीन जणांना ताब्यात घेऊन आज दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

अर्थात घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कारण, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून त्यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो.

मात्र, कोणतीही रिस्क नको म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. तर, संंबंधित पोलीस कर्मचारी हे त्यांच्या घरी देखील आले होते. त्यामुळे, या सर्वांचे नमुने घेतले असून म्हळदेवी केंद्राच्या अंतर्गत त्या कुटूंबातील १७ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment