कोरोनावर लवकरच निर्णायक विजय मिळवू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-नवी दिल्ली : ‘कोरोना व्हायरसविरोधातील युद्धात भारत सर्वच मापदंडांवर अन्य देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे.

त्यामुळे येत्या काही आठवड्यांतच देश या जागतिक महामारीविरोधात निर्णायक विजय मिळवेल, असा ठाम विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी व्यक्त केला.

देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २५.१९ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने यावेळी दिली. डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी देशातील सिव्हिल सोसायटी व स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधला.

त्यात त्यांनी या संस्था शेवटच्या घटकापर्यंत योग्य ती संसाधने पोहोचविण्यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. ‘भारत कोविड-१९ विरोधातील युद्ध जिंकण्याच्या दिशेने बऱ्यापैकी पुढे गेला आहे.

या आजाराविरोधातील युद्धात देशाने सर्वच मापदंडांवर अन्य देशांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांतच भारत या विरोधात निर्णायक विजय मिळवेल, असा मला ठाम विश्वास आहे,’

असे ते म्हणाले. सद्य:स्थितीत कोरोनावर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आपल्या नियमित पत्रकार परिषदेत देशातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर ११ दिवसांवर पोहोचल्याचे तर मृत्यूदर ३.२ वर घसरल्याची माहिती दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

Leave a Comment