अहमदनगरमध्ये टेम्पोतून टरबुजाखाली लपवून ‘याची’ तस्करी, साडे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- टरबुजाखाली सुगंधी तंबाखू लपवून तस्करी करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने पकडला.

 

या टेम्पोत सुगंधी तंबाखू व टरबूज असा नऊ लाखांचा मुद्देमाल व टेम्पो असा एकूण साडेपंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

रमजान मन्सुर पठाण (रा . संजयनगर , अ . नगर) हा महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंध असलेली सुगंधी तंबाखू ही टाटा ९०९ टेम्पोतून (एमएच – ०४ – डीके – ५२६८) टरबूजांच्या खाली लपवून चोरुन विक्री करण्याकरीता काटवन खंडोबा रोड येथे घेवून येणार असल्याबाबत खात्रीशीर माहीती 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि / दिलीप पवार यांनी मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ / बाळासाहेब मुळीक , संदिप घोडके , पोना / सचिन आडबल , रविन्द्र कर्डीले , पोकॉ / संदिप दरंदले , रविंद्र धुंगासे यांना मिळालेल्या माहीती नुसार खात्री करुन कार्यवाही करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

पथक खासगी वाहनाने रवाना केले. त्यांनतर पथकाने दोन पंचासह काटवन खंडोबा रोड, गाझीनगर , अ .नगर येथे जावून सापळा लावून थांबले. त्यांना बातमीतील नमुद वर्णनाचा टेम्पो काटवन खंडोबा रोडने येत असताना दिसला. त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी सदरचा टेम्मो थांबवून टेम्पो चालकास व त्याचे शेजारी बसलेल्या इसमास ताब्यात घेतले.

रमजान मन्सुर पठाण (वय – २८ वर्षे , रा . संजयनगर , अ . नगर), अयाज इस्साक बागवान (वय – ३९ वर्षे , रा . गाझीनगर , काटवान खंडोबा रोड , अ . नगर) या दोघांना पकडले.

 

 

टेम्पाचे झडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोचे पाठीमागील होदामध्ये ९ , ००० / – रु . किं . चे अंदाजे १००० किलो टरबूजे , तसेच टरबूजांचे खाली १ , ४५ , ००० / – रु . किं . च्या सुगंधी तंबाखूच्या प्रत्येकी १० कीलो वजनाच्या प्लॅस्टीकच्या सफेद रंगाच्या व सोनेरी रंगाच्या एकूण १०५ बंग मिळून आल्या.

सदरच्या सुगंधी तंबाखूच्या बॅगा , टरबूजे तसेच ६ , ०० , ००० / – रु . किं . चा एक टाटा कं . चा ९०९ मॉडेलचा टेम्पो नं . एमएच – ०४ – डीके – ५२६८ , सफेद रंगाचा असा एकूण १५ , ५४ , ००० / – रु . चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे

सदरची सुगंधी तंबाखू ही कोठून आणलेली आहे याबाबत ताब्यात घेतलेल्या इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी सदरची सुगंधी तंबाखू ही जूबेर (रा. औरंगाबाद ( पुर्ण नांव , पत्ता माहीती नाही ) याचेकडून विकत आणली असल्याचे सांगितले आहे.

सदर कारवाई बाबत सहायक आयुक्त , अन्न व औषध प्रशासन , अहमदनगर यांना माहीती देण्यात आलेली आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांना जप्त मुद्देमालासह कोतवाली पो . स्टे . येथे हजर केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment