आता अहमदनगरच्या ‘या’ दोन रुग्णालयांत रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत येथील जिल्हा रुग्णालय सरकारने ‘कोव्हिड हॉस्पिटल’ म्हणून घोषित केले आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तसे आदेश काढले आहेत.

त्यामुळे जिल्हा रुग्णालयात करोनासंबंधित रुग्णांव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन हॉस्पिटलचे तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहण केले आहे.

जिल्ह्यातील इतर रुग्णालयांचे अधिग्रहण करून त्या ठिकाणी नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासाठी विळदघाट येथील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज आणि लोणी येथील प्रवरा रुरल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहण करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत. रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या उपचारासाठी त्वरित सेवा उपलब्ध करून द्याव्यात. रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहणार नाहीत,

याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णांना लागणाऱ्या औषधांबाबत सरकारकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार काम करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांवर देण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment