धक्कादायक! तरुणीवर सामूहिक बलात्कार, भावाला विहिरीत ढकलले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  एका १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेपूर्वी आरोपीनी पीडितेच्या भावळविहिरीत ढकलून दिले. ही घटना मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यात घडली आहे.

यातील ५ आरोपीना ताब्यात घेतले आहे. तरुणी आणि तिचा भाऊ मोटरसायकलने पाधर शहरातून परतत होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला रस्त्यात त्यानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी बाईक थांबवली.

तेथे त्यांना एका टोळक्याने अडवले, अशी माहिती बेतूलचे पोलिस अधीक्षक डी. एस. भादोरिया यांनी सांगितले.अत्याचार करणारे सर्व आरोपी हे पीडित तरुणीच्या गावाजवळ असलेल्या कप्पा गावातील रहिवासी आहेत.

हे गाव पाधर आणि पीडित तरुणीच्या गावाच्या मध्यभागी आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपींची एकूण संख्या ७ आहे. त्याना बाईकवरून येणाऱ्या या भावंडांना मध्येच अडवले.

त्यानंतर त्यांनी पीडित तरुणीच्या भावाा मारहाण केली. बाजूच्या विहिरीजवळ खेचत नेले आणि त्याला विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर त्यांनी पीडितेला जवळच्या झाडीत नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती भादुरिया यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment