अहमदनगर ब्रेकिंग : श्रीगोंद्यात शेतकऱ्याचा निर्घुण खून,छातीवर वार, गुप्तांगही कापले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिशय क्रूरतेने हा खून करण्यात आला आहे.

त्याच्या छातीवर खोलवर जखमा आढळल्या. त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मुकूंद वाकडे ( रा. आढळगाव, ता. नगर) हे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, आढळगाव येथील मुकुंद वाकडे यांचा मृतदेह शेतात आढळून आला. सुरुवातीला वीजेचा धक्का बसून हा मृत्यू झाला असावा, असा संशय आला.

परंतु त्यांच्या शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळून आल्या. त्यामुळे हा खून असल्याची खात्री झाली.घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी मुकुंदचे वडील जयसिंग विठ्ठल वाकडे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. संशयावरून पोलिसांनी गावातीलच तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मुकुंदच्या खूनाचा गुन्हा दाखल केला असून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत अशी माहिती संजय सातव, पोलिस उपअधीक्षक, कर्जत, यांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment