त्याने पोलिसाच्या वर्दीवरच टाकला हात, शर्टही फाडला.. शेवटी पोलिसांनी केले असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- रस्त्याने विनाकारण फिरणार्‍या सराईत गुन्हेगाराने ड्युटीवरील पोलिस कर्मचार्‍याच्याच वर्दीवर हात टाकला. त्याची कॉलर पकडून धक्काबुक्की करीत शर्ट फाडला.

सावेडीतील सिव्हिल हडको परिसरातील या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

आरसीपी पथकातील पोलिस कर्मचारी महेंद्र सागर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात प्रमोद ऊर्फ भावड्या दादू पगारे (वय 26, रा. भारत चौक, सिव्हिल हडको, नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरसीपी पथक शहरातून पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सिव्हिल हडको परिसरात प्रमोद पगारे हा तोंडाला मास्क न लावता विनाकारण फिरत होता.

पोलिसांनी त्याला पकडून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू लागले. त्यामुळे संतापलेल्या भावड्या पगारे याने पथकातील पोलिस कर्मचारी महेंद्र सागर यांच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.

या धक्काबुक्कीत सागर यांचा शर्ट फाटला. त्यानंतर पोलिसांनी त्याला चांगलाच लाठीचा प्रसाद दिला. त्यानंतर पकडून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पगारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment