‘त्यांच्या’ निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत : आमदार विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- कृषी व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत आले. सरकारची पणन व्यवस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही.

राहाता बाजार समितीने मात्र लॉकडाऊनच्या काळातही शेतीमाल खरेदी करण्यासाठी केलेली व्यवस्था शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

राहाता बाजार समितीने शासनाच्या नियमांचे पालन करुन शेतमाल खरेदी केला. त्याचा लाभ नगरसह शेजारील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही झाला. बाजार समितीने कांदा खरेदीही सुरु केली.

विखे यांनी रविवारी बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक, व्यापारी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

विखे म्हणाले, कोरोनामुळे संपूर्ण देश थांबला, पण बळीराजा काम करत राहिला, म्हणूनच शेतमालाचा पुरवठा होऊ शकला. मात्र, शासनाच्या एकाही यंत्रणेने शेतमाल खरेदी करण्याची इच्छाशक्ती दाखवली नाही.

शासनाने शेतीमाल खरेदी केला असता, तर तो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली नसती. बाजार समित्या नियोजनपूर्वक सुरु ठेवल्या असत्या, तर शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळाली असती. भवि‍ष्यात भाजीपाल्याबरोबरच इतरही शेतीमालाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment