राज्यात कोरोनाचे २११५ रुग्ण बरे होऊन घरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि. ३ : राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  २११५ रुग्ण बरे झाले आहेत.

आज कोरोनाबाधीत  ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या  १२ हजार ९७४ झाली आहे. तर एकूण  १० हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७० हजार १३९ नमुन्यांपैकी  १ लाख ५६ हजार  ७८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२ हजार ९७४  जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात १ लाख ८१ हजार ३८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून  १३ हजार १५८  लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५४८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २१, पुण्यातील ४, भिवंडीतील १, नवी मुंबईमधील १ मृत्यू आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ११ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४  रुग्ण आहेत तर १०  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.

तर ३ जण ४० वर्षांखालील आहे.  या २७ रुग्णांपैकी १३ जणांमध्ये ( ४८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ८८०० (३४३)

ठाणे: ६० (२)

ठाणे मनपा: ४८८ (७)

नवी मुंबई मनपा: २१६ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: २१२ (३)

उल्हासनगर मनपा: ४

भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)

मीरा भाईंदर मनपा: १४१ (२)

पालघर: ४४ (१)

वसई विरार मनपा: १५२ (४)

रायगड: ३० (१)

पनवेल मनपा: ५५ (२)

ठाणे मंडळ एकूण: १०,२२३ (३७१)

नाशिक: १२

नाशिक मनपा: ४३

मालेगाव मनपा:  २२९ (१२)

अहमदनगर: २७ (२)

अहमदनगर मनपा: १६

धुळे: ८ (२)

धुळे मनपा: २० (१)

जळगाव: ३४ (११)

जळगाव मनपा: १२ (१)

नंदूरबार: १२ (१)

नाशिक मंडळ एकूण: ४१३ (३०)

पुणे: ८१ (४)

पुणे मनपा: १२४३ (९९)

पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)

सोलापूर: ७

सोलापूर मनपा: १०९ (६)

सातारा: ३७ (२)

पुणे मंडळ एकूण: १५४९ (११४)

कोल्हापूर: १०

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: २९

सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)

सिंधुदुर्ग: ३ (१)

रत्नागिरी: ११ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ६१ (३)

औरंगाबाद:५

औरंगाबाद मनपा: २३९ (९)

जालना: ८

हिंगोली: ४२

परभणी: १ (१)

परभणी मनपा: २

औरंगाबाद मंडळ एकूण: २९७ (१०)

लातूर: १२ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ३१ (१)

लातूर मंडळ एकूण: ४७ (२)

अकोला: १२ (१)

अकोला मनपा: ५०

अमरावती: ३ (१)

अमरावती मनपा: ३१ (९)

यवतमाळ: ७९

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: २

अकोला मंडळ एकूण: १९८ (१२)

नागपूर: ६

नागपूर मनपा: १४६ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: ४

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १५८ (२)

इतर राज्ये: २८ (४)

एकूण:  १२ हजार ९७४ (५४८)

टीप – ही माहिती कोरोना पोर्टलवरील आयसीएमआरने दिलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. )

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ९९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११ हजार ७८ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५१.०५ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Leave a Comment