अहमदनगर ब्रेकिंग : शहरात चक्क स्कूल व्हँनमधून दारू विक्री !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर शहरात आता अँब्युलन्सनंतर चक्क स्कूल व्हँनमधून दारू विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

विक्री साठी घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले असून एका जणासह १ लाख ५४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संजय एकनाथ लोणारे (रा.कापूरवाडी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. भिंगार कँम्प पोलीसांनी कारवाई केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर ते कापूरवाडी या रस्त्यावर नागरदेवळेफाटा येथे संजय लोणारे ही व्यक्ती पिवळ्या रंगाच्या स्कूल मारुती व्हँनमध्ये

विदेशी दारु विक्री करत आहे, अशी भिंगार कँम्पचे सपोनी प्रविण पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली.

या खात्रीशीर माहितीनंतर तातडीने घटनास्थळी जाऊन छापा टाकून पंचासमक्ष पिवळ्या स्कूल व्हँन (एमएच १२ ए एफ ४८८९) ची पोलिसांनी झडती घेतली असता,

व्हँनमध्ये ४ हजार ६८० रू. ३६ रम कंपनीच्या सीलबंद बाटल्या मिळून आल्या. स्कूल व्हँन, दारुसह १ लाख ५४ हजार ६८० रुपयांचा

मुद्देमाल जप्त करून संजय लोणारे यांच्या विरोधात भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात दारुबंदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment