अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर नगरमध्ये तुफान दारूविक्री झाली. परंतु केडगावमध्ये एका रिक्षाचालकाने दारु पिल्याने त्याच्या पत्नीने मुलांसह विष प्राशन केले.
सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. या महिलेची प्रकृती गंभीर असून मुलांची प्रकृती सुधारत आहे. केडगावच्या एकनाथ नगर येथील एका रिक्षाचालकाने मंगळवारी रात्री मद्यपान केले.
त्यानंतर भाजी करण्यावरून त्याचा पत्नीशी वाद झाला. रात्री आणि दुसऱ्या दिवशीही कुरबुरी सुरूच होत्या. बुधवारी दुपारी वैतागलेल्या पत्नीने स्वतः विषारी औषध घेतले.
आपल्या दहा वर्षाच्या मुलालाही विषारी औषध पाजले. त्यानंतर ती लहान मुलीलाही औषध पाजू लागली. त्यानंतर तिघांनाही त्रास सुरू झाला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर दोन्ही मुलांना बालरुग्णालयात तर महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही मुलांची प्रकृती सुधारत असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®