….म्हणून गुरुवारी अहमदनगरचा पाणीपुरवठा बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर: एमआयडीसी परिसरातील महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेवरील महावितरण कंपनीच्या वीज रोहित्रामध्ये अचानक बिघाड होऊन आग लागली आहे. त्यामुळे संपूर्ण वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

म्हणून मुळानगर पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणी उपसा पूर्णपणे बंद पडला आहे. त्यामुळे गुरुवारी शहराला पाणी पुरवठा होण्याची शक्यता कमीच असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीच्या एमआयडीसी २३१ केव्ही उपकेंद्रामधील करंट ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला. यामुळे रोहित्राला आग लागली.

या आगीमुळे अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मुळानगर पंपींग स्टेशन येथुन होणारा पाणी उपसा पुर्णता : बंद पडलेला आहे.

पर्यायी ट्रान्सफॉर्मर बाभळेश्वर येथून मागविण्यात आला आहे. एमआयडीसी येथे ट्रान्सफॉर्मर. बसविण्यास व विद्युत पुरवठा सुरू होण्यास मध्यरात्री दोन वाजणार आहेत.

वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पुर्ण क्षमतेने पाणी उपसा पुर्ववत होण्यास तीन ते चार तासाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेच्या टाक्या भरणे शक्य होणार नाही. म्हणून पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Leave a Comment