फक्त एका दिवसात अहमदनगरकरांनी संपविली ‘इतकी’ दारू ! वाचून तुम्हाला बसेल धक्का …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- राज्य सरकारने लॉकडाऊन -3 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दारू दुकाने मंगळवार (दि.5) अटी शर्तीसह खुली झाली. या पहिल्या दिवशी जिल्ह्यात 1 लाख लिटर दारूची विक्री झाली आहे.

यात सर्वाधिक विक्री ही देशीदारूचा समावेश असून एका दिवसात नगरकरांनी 37 हजार 810 लिटर देशी दारू संपविली आहे.

कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे आधी राज्य सरकारने आणि त्यानंतर केंद्र सरकारने दोन टप्प्यात लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे जिल्ह्यातील दारू दुकाने बंद झाली होती.

साधारण 40 दिवसांहून अधिक दिवस दारूची दुकाने बंद होती. हे दुकाने राज्य सरकारने अटी शर्तीसह आणि सामाजिक अंतराचे भान ठेवून सुरू करण्याचे आदेश दिले.

त्यातही दुकान उघडण्याचा कालावधी हा सकाळी 10 ते सायंकाळी 5 असा होता. पहिल्याच दिवशी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी तळीरामांनी गर्दी केल्याने काही तासामध्ये दारूचे दुकाने बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली.

मात्र, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील तळीरामांनी 1 लाख लिटर दारू रिचवली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

यात देशी दारूची 37 हजार 810 लिटर, विदेशी दारू 28 हजार 91 लिटर, बिअर 32 हजार 534 लिटर आणि 893 लिटर वाईनचा यात समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment