अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या वाढली !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

आज संगमनेर शहरातील एक तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 49 झाली आहे.

आज शुक्रवारी सायंकाळी या व्यक्तींचे अहवाल प्रशासनाकडे दाखल झाले आहेत.

संगमनेर शहरातील एक 59 वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाली असून

त्याचबरोबर धांदरफळ येथील दोन पुरुष आणि दोन महिलांचा बाधित व्यक्तींमध्ये समावेश

असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.

दरम्यान, इतर २३ अहवाल निगेटिव्ह आले असून आता अजून ५ व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment