अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज पडणार नाही

सदर लॅबमुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असून ही राज्य शासनाची मान्याता असलेली ही जिह्यातील पहिलीचं टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

विद्यापीठाच्या माॅयक्रोबाॅलोजी विभागाला कोरोना तंत्रज्ञानाला नॅशनल ॲकरेडेशन बाेर्ड फाॅर लॅबरोटरीचे सर्टीफीकेशन व राज्य सरकारची परवानगी मिळाल्या नंतर आयोजीत पत्रकार परिषदेत डाॅ विखे पाटील बोलत होते.

याप्रसंगी कुलगुरु डाॅ वाय.एम.जयराज, मेडीकल काॅलेजचे अधिष्ठाता डाॅ. राजवीर भलवार, माॅयक्रोबाॅयलोजी विभाग प्रमुख डाॅ शरीयार रोशनी , डाॅ रविंद्र कारले उपस्थित होते.

पुढे बोलतांना डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी माॅयक्रोबायलाॅजी विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यंत कमी कालावधीत ‘ट्रुनॅट‘ मशिन व आरटीपीसीआर तंत्रज्ञान स्वीकारत

त्यासाठी लागणारे नॅशनल ॲकरेडेशन बाेर्ड फाॅर लॅबरोटरी यांचे सर्टीफीकेशन मिळवले व आता या कोरोनाच्या टेस्टसाठी लॅबला राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे,

यामुळे पुढील काळात परिसरातील रुग्णांना कोरोनाच्या रिपोर्ट साठी आता दोन दिवस थांबण्याची गरज पडणार नाही हे रिपोर्ट फक्त दोन तासातं उपलब्ध होतील ही सेवा आपण ग्रामीण भागात उपलब्ध करुन शकलो यांचा आनंद असल्याचे सांगितले.

या लॅब मध्ये शासनाकडून आलेल्या कोरोना संशयित रुग्णाच्या स्वॅबची मोफत तपासणी केली जाणार आहे. यावेळी बोलतांना कुलगुरु डाॅ. वाय. एम. जयराज यांनी विद्यापीठाने या संकट काळात येथील नागरिकांना

सेवा देण्याच्या दृष्टीने सहा दिवसात कोविड १९ साठी १०० बेडचे आत्याधुनिक सुविधा असलेल रुग्णालय उभारले त्यानंतर कोरोनाच्या प्राथमिक चाचणीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘ तंत्रज्ञान सहकार्य करार करुन सुरु केले.

यानंतर नवी आत्याधुनिक लॅब सुरु केली व आता त्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आपली तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी बोलतांना माॅयक्रोबाॅयलोजी विभाग प्रमुख डाॅ शरीयार रोशनी यांनी या लॅबच्या माध्यमातुन दोन तासाला चार टेस्ट होतील व हे तंत्रज्ञान पुर्ण पणे सुरक्षीत असुन याचे प्रशिक्षण लॅबच्या टीमला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगीतले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment