वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून नियंत्रण कक्ष स्थापन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व प्रवास करु इच्छिणाऱ्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात

येणाऱ्या वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी विभागीय कार्यालय राज्य परिवहन नांदेड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462-260621 असून  यावर संबंधितांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

कोराना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून  शासनाने 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जारी केला आहे. परिणामी नौकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्यात विविध भागात नागरिक अडकून राहिले आहेत.

या नागरिकांना त्यांचे इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे.

नांदेड विभागातील प्रत्येक आगारात वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचे संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

विभाग नियंत्रक अ. र. कचरे (कंसात भ्रमणध्वनी क्रमांक) कंसाबाहेर कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक- (8275038417) 02462-260175विभागीय वाहतूक अधिकारी सं. बा. वाळवे- (9422185619) 02462-260621

आगार प्रमुख (वरिष्ठ) नांदेड आगार पु. ता. व्यवहारे- (9070706024) 02462-234466.आगार प्रमुख भोकर सु. धु. पवार (8390168613) 02467-202633आगार प्रमुख किनवट मि. पु. सोनाळे (9881391958) 02469-222050.

आगार प्रमुख मुखेड सं. तु. शिंदे (9307786083) 02461-202547आगार प्रमुख देगलूर अ. रा. चव्हाण (7588523782) 9422878417

आगार प्रमुख कंधार ह. म. ठाकुर (9823533890) 02466-223435.आगार प्रमुख हदगाव सं. बा. अकुलवार (9420461711) 02468-222344.

आगार प्रमुख बिलोली च. र. समर्थवाड (8698094565), 02465-223323आगार प्रमुख माहूर वि. तु. धुतमल (8668482504) 02460-268424

 या संपर्क क्रमांकावर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या इच्छुक नागरिकांनी प्रवासाबाबत संपर्क साधावा, असेही आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

Leave a Comment