पोलिसांना फोन करून माहिती दिली पण ‘त्याच्या’वर झाला गुन्हा दाखल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दमधील एका युवकाने पोलिसांना फोन करुन गावात गर्दी झाल्याचे सागितले.

प्रत्यक्षात हा बनवाबनवीचा प्रकार आल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी या युवकावर गुन्हा दाखल केला.

एका युवकाने खोटे नाव सांगत पोलिसांना फोन करुन सांगितले की,

आश्वी खुर्दमधील शिवाजी चौकात मोठी गर्दी झाली आहे. कॉन्स्टेबल वाघ तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

कुठल्याही प्रकारे गर्दी त्यांना आढळली नाही. हा फोन संतोष बंडू लंकारे याने केल्याचे समजले.

ताब्यात घेतल्यानंतर त्याने “मी खोट्या नावाने फोन करुन खोटी माहिती दिली’, असे सांगत चुकीची कबुली दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment