मान्सून ११ जूनला होणार मुंबईत दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : यंदा मान्सून ११ जूनला कोलकाता आणि मुंबईत दाखल होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर दिल्लीत २७ जून रोजी मान्सून दाखल होईल. मान्सूनची मुंबईत दाखल होण्याची यापूर्वीची तारीख १० जून होती.

मान्सून मुंबईतून ८ आॅक्टोबरला परतीचा प्रवास सुरू करेल. असा हि अंदाज वर्तवला आहे. १९०१ ते १९४० दरम्यान देशातील १४९ ठिकाणांहून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार,

देशात मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे आगमन, त्याचा वर्षाव, परतीचा प्रवास यात बदल होत आहेत.

ते लक्षात घेऊन मान्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी तज्ज्ञांकडून जोर धरत होती. परिणामी, हवामान खात्याने १९६१ ते २०१९ दरम्यान ५८ वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला.

तर १९७१ ते २०१९ दरम्यानच्या ४८ वर्षांच्या काळातील मान्सूनचे आगमन, परतीचा प्रवास या आधारावर त्याचे आगमन, परतीचा प्रवास यात काही बदल केले

त्यानुसार, मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जूनच आहे. यात काही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, केरळनंतर पुढे म्हणजे तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार,

उत्तर प्रदेशमध्ये मान्सून दाखल होण्यास काहीसा विलंब होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या परतीच्या प्रवासातही बदल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Comment