तंबाखू, सुपारी व पान मसाला सेवन करणे आणि थुंकण्यावर बंदी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असतानाच २८ राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानरहित तंबाखू, सुपारी व पान मसाला सेवन करणे आणि थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

थुंकीच्या लाळेतून कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, आसाम आणि दिल्लीसह अनेक राज्यांत थुंकण्यावर बंदी असणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानरहित तंबाखूचे सेवन करणे आणि थुंकण्यावर बंदी घालण्याचे आदेश केंद्र सरकारने गेल्या १ एप्रिल रोजी राज्यांना दिले होते.

धूम्रपानरहित तंबाखू, पान मसाला आणि सुपारीचे सेवन केल्याने लाळ निर्माण होते. परिणामी थुंकल्याने त्यातून कोरोनाचा प्रसार वाढण्यास हातभार लागतो. या कारणाने वरील उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ इंडिया’चे मुख्य अधिकारी भावना मुखोपाध्याय यांनी केंद्राचा हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

आसाम, चंडीगड, दिल्ली, झारखंड, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment