१७ मेनंतर लॉकडाऊन नाही, सरकार आखणार हे धोरण ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू केले होते. त्यामुळे बर्‍यापैकी कोरोनाला आळा घालण्यात यश मिळाले. आता १७ मे ला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे.

त्यानंतर सरकार काही पाउल उचलणार आहे? सरकार आता पूर्ण जिल्हा किंवा शहरात निर्बंध न घालता फक्त हॉटस्पॉट असलेले भाग सील करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर चांगलाच परिणाम झाला आहे. त्यामुळे हे चक्र फिरण्यासाठी कंटेन्मेंट झोन वगळून उद्योग- व्यवसायांना सरकारने परवानगी दिली. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारने याशिवायही आणखीही काही निर्णय घेतले आहेत.

यात उत्पादन आणि किरकोळ विक्रीचा समावेश आहे. काही राज्यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या भागांवर निर्बंध घातले आहेत. यामुळे मजुरांच्या कमतरतेने आर्थिक उलाढाल सुरू झालेली नाही.

मजुरांअभावी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी मालाची वाहतूक रोडावली आहे. लॉकडाऊन पूर्वी २२ लाख ई-वे बिल भरले जात होते. आता ही संख्या ६ लाखांवर आली आहे.

लॉकडाऊनच्या सुरुवातीला ही संख्या फक्त ३.२ लाख इतकी होती. गेल्या तीन आठवड्यात त्यात दुप्पाट वाढ झाली आहे. दुपारी ३.०० वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही चर्चा पार पडणार आहे. देशात करोनाशी निगडीत वेगवेगळ्या मुद्यांवर ही चर्चा पार पडणार आहे. तेलंगणने २९ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.

अजूनही काही राज्य लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजूने आहेत. यामुळे सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष असेल.

Leave a Comment