Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणाऱ्या सरपंचांनाच बेदम मारहाण !

0

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुमशेत गावात जनजागृती व त्या अनुषंगाने सांगितले म्हणून त्याचा राग मनात धरून सहा ते सात लोकांनी कुमशेतचे सरपंच सयाजी तुकाराम अस्वले यांना मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांना संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी अकोले पंचायत समितीचे सभापती, उपसभापती दत्ता देशमुख, राजूरचे सरपंच गणपत देशमुख, सदस्य भास्कर येलमामे, कुमशेतचे सरपंच सयाजी अस्वले उपस्थित होते.

निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, कुमशेत हे पर्यटन स्थळ असून या निमित्ताने अनेक लोकांची ये-जा असते. तथापि, कोरोनामुळे गावामध्ये नाकाबंदी करून बाहेगावच्या लोकांना गावात येण्यास बंदी आहे.

गावामध्ये सर्वांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, गर्दी करू नये, स्वच्छता पाळावी, सॅनिटायझरचा वापर करावा याबाबत जनजागृती तसेच विविध संस्थांकडून

आदिवासी गोरगरिबांना आलेली वस्तुरूपी मदत सर्वांना कशी मिळेल अशा प्रकारे नियोजन ग्रामपंचायतीमध्ये सुरु असताना अमोल इंदोरे, बंडू अस्वले,

सोपान अस्वले, गोरक्ष अस्वले, मच्छद्रिं इंदोरे, एकनाथ इंदोरे, अंकुश अस्वले यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कोणतेही कारण नसताना मारहाण करीत ग्रामपंचायतीतील खुर्चाची मोडतोड केली.

त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणी राजूर पोलिसांत अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे राजूर पोलिसांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

li